भाजप आमदाराचा पेट्रोल पंप सील

0

बीड / बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजप आमदार भीमराव धोंडे यांच्या पेट्रोल पंपवर कारवाई करत सील करण्यात आलं.

पेट्रोल पंपावरील वजन मापे व किमतीत त्रुटी आढळल्याने कंपनीच्या अधिकार्‍यांनी पंपास सील ठोकले.

आष्टी मधल्या नगर- बीड रोडवरील भारत पेट्रोलियम कंपनीच्या पंपाची गुण नियंत्रक पथकाने काल (मंगळवार) अचानक तपासणी केली.

पण यावेळी तपासणीत पेट्रोल पंपावरील वजन मापे व किंमतीत त्रुटी आढळल्या. त्यामुळे पेट्रोल पंप सील करण्यात आले आहे.

याप्रकरणी संबंधित अधिकार्‍यांनी काहीही बोलण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ही कारवाई नेमकी कशामुळे करण्यात आली आहे याबाबत नेमकं कारण समजू शकलेलं नाही.

आज (बुधवार) पुन्हा एकदा या पेट्रोल पंपची तपासणी होणार आहे. या तपासणीसाठी दुसरं पथक येणार आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे भाजप आमदार धोंडेंना चांगलाच धक्का बसला आहे. याप्रकरणी संबंधितांवर नेमकी काय कारवाई होणार का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.

LEAVE A REPLY

*