भारत 23 जून ते 9 जुलै वेस्ट इंडिज दौऱ्यावर!

0

भारताचा वेस्ट इंडिज दौरा 23 जूनपासून सुरु होईल.

बीसीसीआयने भारताच्या या दौऱ्याची मंगळवारी घोषणा केली.

चॅम्पियन्स ट्रॉफी 1 जून ते 18 जून या कालावधीत खेळली जाणार आहे. वेस्ट इंडिजसोबत भारत पाच वन डे सामने आणि एक टी-20 सामने खेळणार आहे. 23 जून ते 9 जुलै या काळात हे सामने खेळवण्यात येतील.

पहिले दोन वन डे सामने पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वींस पार्क ओव्हल मैदानावर 23 आणि 25 जून रोजी खेळवण्यात येतील. तर तिसरा आणि चौथा वन डे सामना एंटिगातील सर व्हिव्हियन रिचर्ड्स मैदानावर खेळवला जाणार आहे.

अखेरचा आणि पाचवा वन डे सामना जमैकातील सबीना पार्क मैदानात, तर एकमेव टी-20 सामनाही याच मैदानात खेळवला जाईल, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.

LEAVE A REPLY

*