भारत सरकार पाकच्या ११ कैद्यांना आज सोडणार

0
भारत सरकार सोमवारी  (आज) सदिच्छा हेतूने 11 पाकिस्तानी कैद्यांची सुटका करणार आहे.
कझाकस्तान येथे शांघाय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यामध्ये झालेल्या अनौपचारिक भेटीनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे.
या कैद्यांनी त्यांची शिक्षा भोगून पूर्ण केलेली असल्यामुळे पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची मागणी केली होती.
भारतीय नागरीक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेनंतर भारताकडून प्रथमच अशा प्रकारे कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे.
या सर्व कैद्यांना वाघा बॉर्डरवरून पाकिस्तानला पाठवण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजत असल्याचे वृत्त ‘एएनआय’ने दिले आहे.

LEAVE A REPLY

*