भारत पाकिस्तानला नमवणारच – व्ही.व्ही.एस. लक्ष्मण

0
चॅम्पियन्स ट्रॉफीत सलामीची लढत भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध सामना आहे.

माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ चॅम्पियन्स ट्रॉफी सलामीच्या लढतीत पाकिस्तानला हरवून भारत विजेतेपद राखणारच, असा विश्वास लक्ष्मणने दर्शवला आहे

“मला विश्वास आहे की भारत चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करेल आणि या स्पर्धेचे विजेतेपद करेल”, असे लक्ष्मणने सांगितले.

केनिंग्टन ओव्हलमध्ये न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्या विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात भारताने सहजरित्या विजय मिळवून चॅम्पियन्स ट्रॉफीत आपली दावेदारी मजबूत केली आहे.

न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या सराव सामन्यात गोलंदाजांनी प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडला 189 धावांत माघारी धाडले. त्यानंतर पावसाच्या व्यतयानंतर डकवथ नियमानुसार, 45 धावांनी विजय मिळविला. बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या सराव सामन्यात बांगलादेशवर 240 धावांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला.

“गेल्या दोन सराव सामन्यात खेळल्या गेलेल्या खेळपट्टीवर शिखर धवनने जी फलंदाजी केली त्यावर मी खूप प्रभावित झालो असून दिनेश कार्तिकनेही बांगलादेशविरूद्ध लढतीत संधीचा योग्य फायदा उचलला दिली,” लक्ष्मण म्हणाला. .

केदार जाधव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याही धावा करत आहेत.

42 वर्षीय भारत-पाकिस्तान लढतीविषयी बोलताना ते म्हणाले की, हा खूप चांगला खेळ आहे. पाकिस्तान विरुद्धचा सामना अतिशय तीव्र असेल.

“जर आपण (भारत) आमच्या क्षमतेनुसार खेळू तर निश्चितपणे आपण(भारत) सामना जिंकू.”

द मेन इन ब्लू ची  चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिम बर्मिगहॅम येथे 4 जून रोजी, त्यानंतर श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्याशी 8 जून आणि 11 जून रोजी अनुक्रमे 8 आणि 11 जून रोजी सुरू होणार आहे.

LEAVE A REPLY

*