भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला मारहाणीचा प्रयत्न; तिघांना अटक

भारतीय क्रिकेट संघातील गोलंदाज मोहम्मद शमीला कोलकाता येथे चौघांनी शिवीगाळ आणि मारहाणीचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.

शमीने त्यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

शमीने तक्रारीत चौघांनी शिवीगाळ तसेच मारहाणीचाही प्रयत्न केला. इमारतीच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली, असा आरोप  केला आहे.

शमीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रणाच्या मदतीने शिवीगाळ करणाऱ्यांची ओळख पटवली असून चौघांनाही ताब्यात घेतले आहे. तिघांना अटक करण्यात आली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

LEAVE A REPLY

*