भारतासह 80 देशांमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार

0

भारतासह 80 देशातील नागरिकांना कतारने व्हिसा-फ्री प्रवेश जाहीर केला आहे.

कतार सरकारने हवाई वाहतूक आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

भारतासह युरोपातील डझनभर देश, लेबनन, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि यूएसमधील नागरिकांना कतार देशात ऑन अरायव्हल टुरिस्ट व्हिसा मिळणार आहे.

33 देशातील नागरिकांना 180 दिवस (सहा महिने) तर उर्वरित 47 देशातील नागरिकांना 30 दिवसांपर्यंत कतारमध्ये वास्तव्य करता येईल.

सुरक्षा आणि आर्थिक निकष, त्याचप्रमाणे देशाच्या क्रयशक्तीवरुन ही विभागणी करण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*