TWEET: भारतात Galaxy S8, Galaxy S8+ स्मार्टफोनचे 19 एप्रिलला लाँचिंग

0

सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलक्सी S8 आणि गॅलक्सी S8+ भारतात 19 एप्रिलला लाँच होणार आहे.

सॅमसंग इंडियाने ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. ‘भारतात 19 एप्रिल 2017ला सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8+ अनबॉक्ससाठी तयार राहा. #UnboxYourPhone’

सॅमसंगनं भारतात आपल्या गॅलक्सी S8 डिव्हाईसचे प्री बुकींग सुरु केले आहे.

सॅमसंग गॅलक्सी S8 आणि S8 प्लसमध्ये 6.2 इंच डिस्प्ले असून त्याचं रेझ्युलेशन 1440×2960 पिक्सल आहे. या स्मार्टफोनला कर्व्ह्ड एज देण्यात आले आहे. सॅमसंगने आपले ट्रेडिशनल फिजिकल होम बटण हटवून यात आता इनव्हिजिबल होम बटण दिले आहे. तसंच रिअर पॅनलवर कॅमेऱ्याचा खाली फिंगरप्रिंट सेन्सरही दिले आहे.

LEAVE A REPLY

*