‘ब्ल्यू व्हेल’ नंतर आता ‘पिंक व्हेल’ ऑनलाइन गेम

0

रशियामध्ये दहशत पसरवणाऱ्या ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळे आतापर्यंत जगभरात शंभरहून अधिक मुलांनी आत्महत्या केल्या.

ही सगळी मुलं १२ ते १६ वयोगटातली होती.

मुलांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या या खेळाला टक्कर देण्यासाठी आता ‘पिंक व्हेल’ हा ऑनलाइन खेळ आलाय.

आत्महत्या रोखण्यासाठी या खेळाची निर्मिती करण्यात आलीये.

ब्लू व्हेलसारखीच या खेळातील प्लेअरला ५० वेगवेगळी आव्हानं दिली जातात.

पण ही आव्हानं ब्लू व्हेलपेक्षाही वेगळी आहेत. आपल्या मित्र मैत्रिणींनीशी संवाद साधणं, आपलं त्यांच्यावर किती प्रेम आहे हे सांगणं, तुटलेली नाती पुन्हा जोडणं, भांडणं मिटवणं अशी वेगवेगळी आव्हानं यात दिली जातात.

शेवटच्या टप्प्यात मुलांना एखाद्या गरजू माणसांना किंवा प्राण्यांना मदत करण्याचं आव्हान दिलं जातं. अशा प्रकारे मुलं जगण्यावर प्रेम करायला शिकतात असं हा खेळ तयार करणाऱ्या गेमरचं म्हणणं आहे.

अंधेरी पूर्वेकडील ‘शेर ए पंजाब’ वसाहतीत राहणाऱ्या मनप्रीत सिंग या चौदा वर्षांच्या विद्यार्थ्यांने शनिवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास आत्महत्या केली. ‘ब्ल्यू व्हेल’ या ऑनलाइन खेळामुळेच त्यानं आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला होता.

LEAVE A REPLY

*