ब्लू व्हेल गेमचा मास्टर माईंड अटकेत

0

रशियन पोलिसांनी ब्लू व्हेल गेमच्या मास्टरमाईंडला अटक केली आहे. अटक करण्यात आलेली आरोपी 17 वर्षाची मुलगी आहे.

ब्लू व्हेल गेम चॅलेंजमागे तिचाच हात असल्याचा पोलिसांचा दावा आहे.

ही मुलगी ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्यांना टास्क द्यायची. त्यानंतर टास्कच्या नावे आत्महत्येस प्रवृत्त करायची. जर टास्क पूर्ण केला नाही, तर गेम खेळणाऱ्याला त्याच्या परिवाराची हत्या करण्याची धमकी देत असे, असा आरोप तिच्यावर आहे.

 

आरोपी तरुणीला तिच्या घरातून अटक करण्यात आली.

 

आरोपी मुलगी मनोविज्ञानाची विद्यार्थिनी आहे. तिने आपला गुन्हा कबूल केल्याचाही दावा पोलिसांनी केला आहे. आरोपी मुलीला न्यायालयात हजर केलं असता, तिला तीन वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

 

LEAVE A REPLY

*