ब्रिटनमधील 1 हजार श्रीमंतांची यादी जाहीर; 40 हून अधिक भारतीयांचा समावेश

0

ब्रिटनमधील एका वृत्तसंस्थेने 2017 या वर्षातील 1 हजार श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे.
यामध्ये 40 हून अधिक भारतीय वंशाच्या व्यक्तींचा समावेश आहे.
भारतीय वंशाचे हिंदुजा बंधु 16.2 अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह सर्वोच्च स्थानी असून, मागच्यावर्षीच्या तुलनेत त्यांच्या संपत्तीमध्ये 3.2 अब्ज पाऊंडनी वाढ झाली आहे.
ब्रिटनमधल्या 134 अब्जाधीशांच्या एलिट ग्रुपमध्ये श्रीचंद (81) आणि गोपीचंद (77) हे हिंदुजा बंधु पहिल्या स्थानावर आहेत.
तेल, गॅस, आयटी,ऊर्जा, मीडिया, बँकिंग, प्रॉपर्टी आणि आरोग्य या क्षेत्रात हिंदुजा बंधुंनी मोठी गुंतवणूक केली आहे. मागच्यावर्षी हिंदुजा बंधु ब्रिटनमधील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये दुस-या स्थानावर होते.
यावर्षी युक्रेनियन उद्योगपती लेन ब्लावाटनीक 15.9 अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह दुस-या स्थानावर आहे.
भारतात जन्मलेले डेविड आणि सिमॉन बंधु मागच्यावर्षी पहिल्या स्थानावर होते. ते आता तिस-या स्थानावर गेले आहेत. त्यांच्याकडे 14 अब्ज पाऊंडची संपत्ती आहे.
प्रसिद्ध स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल 13.2 अब्ज पाऊंडच्या संपत्तीसह चौथ्या स्थानावर आहेत.
जगात सर्वाधिक स्टीलची निर्मिती करणारे लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीमध्ये 6.1 अब्ज पाऊंडनी वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

*