बोरद परिसरात घरांची पडझड

0
बोरद ता.तळोदा / तळोदा तालुक्यातील बोरद व परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेले शेतकरी व शेतमजूर समाधानी झाला आहे.
सकाळपासून ढगाळ वातावरण होते. उकाडा होत होता, गरमी होत होती. हवा वाहन नसल्याने झाडांचे पानेही हालत नव्हते. दुपारी 3 वाजता जोरदार पावसाला सुरूवात झाली.

दीड तास सतत पाऊस झाल्याने गावाच्या गल्ली-गल्लीतून पाणी वाहू लागले. जंगलात कामासाठी गेलेले शेतकरी व शेतमजूर कामे सोडून घरी परत आले.

पेरणीयोग्य व वेळेवर पाऊस आल्याने शेतकरी खुष झाला आहे. पपई, केळी, कापूस पिकाची लागवड जोरात सुरू होती. त्यामुळे पिकांना योग्य वेळी मुबलक पाणी मिळाला आहे.

अचानक पाऊस आल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील घरांची किरकोळ पडझड झाली आहे.

दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून परिसरातील नदीनाल्यांना पाणी आले आहे. त्यामुळे आल्हाददायी वातावरण आहे.

LEAVE A REPLY

*