बोटक्लबवर रंगणार कौटुंबिक सोहळे ; पर्यटनवृध्दीसाठी आता महामंडळाचा निर्णय

0

नाशिक : पर्यटनवाढीस चालना मिळावी तसेच परिसर सुस्थितीत राहावा याकरीता गंगापुर धरणालगत उभारण्यात आलेल्या बोटक्लबच्या रेस्टॉरंट परिसरात कौटुंबिक सोहळे साजरे करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यामूळे आता बोटक्लब परिसर वाढदिवस, लग्नसमारंभ, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी खुले करून देण्यात येणार आहे.

आघाडी सरकारच्या कार्यकाळात गंगापूर धरणावर तयार करण्यात आलेल्या बोटक्लब परिसर सध्या वापराविना पडून आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून उभारण्यात येणारया रिसॉर्टचे कामही पूर्ण होउ शकलेले नाही. तसेच बोटींगही सुरू झालेले नाही. त्यामुळे कोटयावधी रूपये खर्चुनही त्याचा उपयोग होत नाही.

त्यामूळे या वास्तूचा वापर वाढावा, पर्यटनवृध्दीस चालना मिळावी आणि महत्वाचे म्हणजे या वास्तूची देखभाल व्हावी याकरीता पर्यटन विकास महामंडळाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे येथील नयनरम्य वातावरणात लग्नसमारंभ, वाढदिवस, डोहाळे जेवणाचे कार्यक्रम येथे साजरे करता येणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत महामंडळाच्या अटी, शर्थींच्या अधीन राहून येथे कार्यक्रम साजरे करता येतील.

याकरीता चार तासांसाठी पाच हजार रूपये, आठ तासांसाठी सात हजार रूपये, पूर्ण दिवसासाठी दहा हजार रूपये दर आकारणी करण्यात येणार आहे. तसेच परिसर स्वच्छता, वीज वापर, सेवाकरासाठी दोन हजार रूपये अतिरिक्त शुल्क आकारणी करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*