‘बॉम्ब फेकलाच तर तो सुतळी बॉम्ब असेल’ – आमदार बच्चू कडू

0

शेतकरी संपाची दिशा ठरविण्यासाठी नाशिकमध्ये काल झालेल्या शेतकरी परिषेदत आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकण्याचे वक्तव्य केले.

आमदार बच्चू कडू यांच्या वक्तव्याची भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून बच्चू कडू यांना दहशतवादी घोषित करण्याची मागणी भाजप कार्यकर्त्यांनी केली आहे.

जर सरकारने  शेतकाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर भगत सिंहांनी ज्या प्रकारे संसदेवर बॉम्ब टाकला त्याच प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या घरावर बॉम्ब फेकू असे आमदार बच्चू कडू म्हणाले होते.

बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.

बच्चू कडूंनी यानंतर दिलेल्या स्पष्टीकरणात

‘बॉम्ब फेकणार याचा अर्थ खरोखर बॉम्ब फेकणार नाही आणि जर बॉम्ब फेकलाच तर तो फक्त आवाज करणारा सुतळी बॉम्ब असेल’.

 

LEAVE A REPLY

*