‘बॉण्ड गर्ल’ मॉली पीटर्सचे निधन

0

चित्रपटसृष्टीत बॉण्ड गर्ल म्हणून ओळख मिळवणारी अभिनेत्री मॉली पीटर्सचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदयझटक्याने निधन झाले.

इंग्लंडमधील वॉल्शम-एल-विलोज् येथे जन्म झालेल्या मॉलीने १९६० साली मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली.

टेरेंस यंग दिग्दर्शित ‘थंडरबॉल’ या बॉण्डपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.

अनेक अ‍ॅडल्ट सीनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या या चित्रपटाला ब्रिटिश बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने एक्स प्रमाणपत्र दिले होते; परंतु मॉलीने या चित्रपटातून प्रेक्षकांचे मन जिंकले.

पुढे अभिनय क्षेत्रात ती फार काळ टिकू शकली नाही. डास एक्स्पेरिमेंट्स (१९६६), टारगेट फॉर किलिंग (१९६६), डोंट राइस द ब्रीज, लोअर द रिव्हर (१९६८) हे काही मोजके चित्रपट वगळता अभिनय करण्याची फारशी संधी तिला मिळाली नाही.

 

LEAVE A REPLY

*