बॅकाकडून जादा दराच्या नोटा नसल्याचे फलक

0

पाथर्डी ( प्रतिनिधी) – नोटबंदी नंतरचा खरा परिणाम आता गाव पातळीवरील दैनंदिन उलाढालीवर दिसु लागला असून बाजारातुन शंभर पाचशेच्या नोटा गायब होउन बँकाकडे अल्प दराच्या नोटा ठेवायला जागा नाही . पाच ,दहा हजार रुपये सर्वसामान्यांना हाताळायला अवघड जात असुन यामुळे खिसेकापू , चोरटे, बॅगाचोर आदिना आयती शिकार सापडत आहे. बँकानी सुध्दा जादा दराच्या नोटा उपलब्ध नसल्याबद्दल फलक लावले आहेत.

 
सध्या लग्न सराई शाळा प्रवेश , बस्ते खरेदी व सुट्टयामुळे बाजार पेठेत ग्राहक वाढले असुन बाजार पेठेत पाय ठेवायला जागा नाही आंबे विक्रेत्याकडून दोन पेटया आंबे विकत घेतले तरी हजार रूपये कुठे ठेवायचे असा प्रश्न विक्रेत्याला पडतो एक विक्रेता दिवसाला तंबु लावुन किमान 25 पेटया आंबे विकतो त्याने पैसे सांभाळायचे ,आंबे सांभाळायचे की ग्राहकाकडे लक्ष दयायचे असा प्रश्न आहे.कोथंबीरीची मोठी जुडी 25 रूपयाला मिळते रस्त्यावर बसुन दिवसभरात शंभर जुड्या विकल्यावर ते पैसे ठेवायला विक्रेत्याला आसपासच्या मोठया दुकानदाराकडे धाव घ्यावी लागते . या बदल्यात एक जुडी सप्रेम भेट म्हणुन दिली जाते .

 

आहेराचे कन्यादानाचे सामान किमान दहा हजारापर्यंत होते 10, 20 रूपये दराच्या नोटा देता घेता मोजल्या जातात त्यात खुप वेळ जातो. पतसंस्थामध्ये सुध्दा असाच भरणा येतो तो राष्ट्रीयकृत बँकेत जातो तेथे मोठ्या दराच्या नोटा बाजूला काढुन कमी दराच्या नोटा परत ग्राहकाच्या माथी मारल्या जातात जुने वनवे बसस्थानक , मुख्य बाजारपेठेत खिसेकापूचा सुळसुळाट वाढला आहे .बँका पुढे खबरे बसुन बॅगेत अथवा गाडीच्या डिकीत कणी पैसे ठेवले याची बातमी लीक होते काही वेळातच चोरटे कार्यक्रम पूर्ण करतात काही सराफांनी कमी दराच्या नोटा असतील तर वेगळा भाव ठेवुन ग्राहकापुढे नवा पेच वाढविला आहे अगदी सुनमुखाचे सोन्याचे मनी सुद्धा दीड दोन हजाराचे होतात एक विक्रेता दिवसभरात शंभर मणी विकतो .

 

मोठया दराच्या नोटा नेमक्या कुठे गेल्या याची जाहीर चर्चा सध्या तालुक्यात सुरू असुन ग्राहक, व्यापारी, हॉटेल, मालक,दूकानदार सगळेच वैतागले आहेत वडा-पाव च्या गाडयावर दिवसभरात किमान दोनशे ग्राहक होतात 15 रूपये दराने गोळा होणारे माल विक्रीचे पैसे खिशात ठेवताना तसेच हाताळताना नोटांना तेलाचे हात लागतात तेलकट नोटा ग्राहक घेत नाही त्यातच पाच, दहा रुपयाचे नाणे बंद झाल्याच्या अफवेने तर दैनंदिन व्यवहारिक जगण्याच्या अडचणी खुप वाढल्या आहेत .कॅशलेस इंडिया ऐवजी लेसकॅश इंडियामुळे सध्या सर्व जण वैतागले आहेत मोठया दराच्या नोटा काळया बाजारात साठविल्या जात आसल्याने लहान दराच्या नोटावर व्यवहार करण्याची वेळ आल्याचे समजते या टंचाईचा गैरफायदा उठवत काही बँकानी रद्द करण्यासाठी संकलीत केलेल्या फाटक्या वजीर्ण नोटा पुन्हा चलनात सोडल्या आहेत.

 

  शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेने कॅश काउंटरवर फलक लावुन  रिझर्व बँकेकडून पुरवठा न झाल्याने बँकेमध्ये 50, 20, 10च्या नोटा उपलब्ध असुन त्यांचा स्वीकार करून सहकार्य करावे  अशी विनंती केली आहे.

LEAVE A REPLY

*