बुधवारपर्यंत पडणार हातोडा; हॉस्पिटलची पार्किंग होणार खुली

0

पोलीस बंदोबस्ताची प्रतिक्षा

अहमदनगर (प्रतिनिधी)– अनधिकृत इमारतीमध्ये सुरू असलेले हॉस्पिटलच्या पार्किंग खुल्या करण्याचा, बेकायदा बांधकाम पाडण्याचा निर्णय पालिकेने एकदाचा घेतला आहे. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणीही केली आहे. 9 तारखेपर्यंत केव्हाही हॉस्पिटल इमारतीवर हातोडा टाकला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नगर शहरात 150 हॉस्पिटल व 334 क्लिनकच्या इमारती या अनधिकृत आहेत. महापालिकेच्या नियमांना कात्री लावत या इमारतीमधून हॉस्पिटल सुरू आहेत. उच्च न्यायालयाने कान उपटल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कारवाईच्या फाईलवरील धूळ झटकत ती आयुक्तांच्या टेबलवर आली आहे. 52 हॉस्पिटलच्या इमारती या अनधिकृत असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहेच. त्यामुळे या इमारतीवर केव्हाही हातोडा पडेल. त्यासाठी महापालिकेने पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन पोलीस बंदोबस्त मागविला आहे. 5 ते 9 तारखेपर्यंत पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. आज महापालिकेला पोलीस बंदोबस्त मिळालेला नव्हता, त्यामुळे कारवाई झाली नाही.
मात्र 10 तारखेला औरंगाबाद खंडपीठासमोर होणार्‍या सुनावणीवेळी महापालिकेला अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट सादर करायचा आहे. त्यामुळे कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्यायच महापालिकेसमोर नाही.

LEAVE A REPLY

*