बीड राष्ट्रीय महामार्गावर दोन दुचाकींमध्ये धडक; अपघातानंतर बाईकबरोबर ‘तो’ही पेटला

0

बीडमधल्या राष्ट्रीय महामार्गावर दुचाकींची एकमेकांना धडक बसल्यानंतर एक बाईकस्वार गंभीर जखमी झाला, तर दुसऱ्या बाईकने जागीच पेट घेतला. त्या आगीत बाईकस्वारही होरपळत होता, मात्र खेदाची गोष्ट म्हणजे एकही वाहनचालक त्याच्या मदतीसाठी थांबला नाही.

उलट बघे घटनेचा व्हिडिओ काढत बसले.

एका इंग्रजी वृत्तसंस्थेने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील महामार्गावर गुरुवारी हा व्हिडिओ काढण्यात आला.

दुर्दैवाने तो बाईकस्वार दुचाकीखाली अडकून बेशुद्ध पडल्याने त्याला जीव वाचवण्यासाठीही वेळ मिळाला नाही. पोलिस घटनास्थळी दाखल होऊन आग विझवेपर्यंत तो गंभीर भाजला होता. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, त्यावेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. बाईकस्वाराची ओळखही पटू शकलेली नाही.

जखमी बाईकस्वारावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

LEAVE A REPLY

*