बिहार : रेल्वेखाली उडी घेऊन जिल्हाधिकाऱ्याची आत्महत्या

0

बिहारमध्ये जिल्हाधिकाऱ्यानी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली .

बक्सर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपवलं.

मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे, असं मुकेश पांडे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत म्हटलं आहे.

मुकेश पांडे काल सकाळी पाटण्याहून दिल्लीत आले होते. त्यानंतर सुमारे 14 तासांनी त्यांनी रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली.

मी माझ्या इच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या मृत्यूनंतर, माझ्या आत्महत्येची माहिती माझ्या नातेवाईकांना द्या. मी दिल्लीतील लीला पॅलेस हॉटेलमधील 742 नंबरच्या खोली घेतली आहे. तिथे माझ्या बॅगेत सुसाईड नोट आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

*