बिघडलेल्या समन्वयातून बेशिस्तीचा जन्म!

0
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुणे, औरंगाबाद, नाशिक जिल्ह्यांच्या तुलनेत नगरशहर सर्वात बेशिस्त असल्याचे चित्र अपणास पहावयास मिळत आहे.

शहरातील वाहतूक, अतिक्रमण, सिग्नल, जुगार, मटक्याचे अड्डे, भ्रष्टाचार, बनावट दारूचे कारखाने, जातीय दंगली, दोन गटातील वाद, स्त्रीयांवरील अत्याचार, बाल मजुरी, गुन्हेगारी, अवजड वाहनांना शहरात प्रवेश अशा अनेक कारणांमुळे शहर बेशिस्त व बदनाम झाल्याचे दिसत आहे.

याला सर्वस्वी पोलीस प्रशासन, महानगरपालिका त्याचसोबत नागरिकही जाबाबदार असल्याची चर्चा आहे. नाही या अविर्भावात या प्रशासकीय यंत्रणा राबताना दिसत आहेत.

नगर शहराची लोकसंख्या साडेचार लाखाच्या आसपास आहे. मोठमोठे व्यापारी, उद्योजक व चांगल्या पदावर असणारे अधिकारी शहरात आहेत. दररोज कोट्यावधींची उलाढाल एकाट्या कापड बाजारात चालते. मात्र  शहरात प्रवेश करण्यापासून तर बाहेर पडेपर्यंत खडतर रस्ते, बंद पडलेले सिग्नल, तुटलेले दुभाजक, वाकलेले विद्युत पोल, पादचारी मार्गावर जनावरांचे गोठे, बस स्थानकांची दुरवस्था, सिग्नलवर पोलीस उभा असला तरी तो केवळ दिसण्यापुरताच. शहरात प्रवेश करताना रस्त्याच्या मधोमध वाहने लावली जाण्याची परंपरा आजही आहे.

शहरात रस्त्याच्याकडेला वाळूची मोठमोठी ढिगारे, रस्त्यात विनापरवाना तंबु ठोकणे, वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करणे, टवाळ मुलांच्या रस्त्यात गप्पा रंगणे, मोकाट जनावरांचा रस्त्यात ठिय्या, भर रस्त्यात कचर्‍याचा ढिग, सर्कल किंवा सामाजिक व गर्दीच्या ठिकाणी शुभेच्छा, अभिष्टचिंतन, वाढदिवसांचे बोर्ड, रस्त्यात विक्रेत्यांची धिटाई, दुकानदारांच्या दुकानासमोर रस्त्यावर शेड टाकणे, टपर्‍या असे चित्र सर्रास नजरेस पडते. या सगळ्या बेशिस्त प्रकारावर पोलीस किंवा महानगरपालिकेला कारवाईचे अधिकार आहेत, मात्र ही आपली जबाबदारी

वाहतूक शाखा नावापुरतीच..
नगर शहरात वाहतूक शाखा आहे की नाही, हा प्रश्‍न पडला आहे. पत्रकार चौकातील सिग्नलवर पोलीस उभे असताना देखील त्यांना कोणी जूमानत नाही. त्यांनी वाजविलेल्या शिट्टीला कोणी दाद देत नाही, तर उलट टिबलशीट चाललेल्या वाहनाचालकांशी पोलीस गप्पा मारत असल्याचे चित्र दिसून येते. शहर वाहतूक शाखेच्या समोरून अवैध वाहतूक खुलेआम सुरू असते. या शाखेला पोलीस निरीक्षक आहे की नाही असा प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. शहरातील नो पार्कींगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष क्रेनची मागणी करण्यात आली होती. हे क्रेन वाहतूक शाखेला मिळाले देखील.

परंतु जिल्हाधिकारी कार्यालय, दिल्लीगेट, कोर्ट, माळीवाडा, मनपा असे काही ठरावीक ठिकाणे सोडली तर त्यांना शहरातील मध्यवर्ती भागात मज्जाव करण्यात आला आहे की काय असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. ज्या ठिकाणी वादात्मक परिस्थिती निर्माण होईल त्या ठिकाणी किंवा माध्यमांमध्ये झळकण्यासाठी काय करता येईल अशा ठिकाणी या क्रेनची कारवाई सुरू असते. त्यामुळे शहरात वाहतूक शाखा असून नसल्यासारखी झाली आहे.

नगर शहरात वाहतूक शाखा आहे की नाही, हा प्रश्‍न पडला आहे. पत्रकार चौकातील सिग्नलवर पोलीस उभे असताना देखील त्यांना कोणी जूमानत नाही. त्यांनी वाजविलेल्या शिट्टीला कोणी दाद देत नाही, तर उलट टिबलशीट चाललेल्या वाहनाचालकांशी पोलीस गप्पा मारत असल्याचे चित्र दिसून येते.

शहर वाहतूक शाखेच्या समोरून अवैध वाहतूक खुलेआम सुरू असते. या शाखेला पोलीस निरीक्षक आहे की नाही असा प्रश्‍न उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. शहरातील नो पार्कींगमध्ये लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष क्रेनची मागणी करण्यात आली होती. हे क्रेन वाहतूक शाखेला मिळाले देखील. परंतु जिल्हाधिकारी कार्यालय, दिल्लीगेट, कोर्ट, माळीवाडा, मनपा असे काही ठरावीक ठिकाणे सोडली तर त्यांना शहरातील मध्यवर्ती भागात मज्जाव करण्यात

पोलीस अधिकार्‍यांना त्रिपाठींच्या बदलीचा वेध..
पोलीस अधिक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांच्या बदलीचे वारे अधिकार्‍यांना लागले आहे. शहरातील सहायक पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांची देखील बढतीवर बदली अपेक्षित आहे.

अप्पर पोलीस अधिक्षक शहरात असून नसल्यासारखे आहेत. त्यांचा शहरातील पोलीस अधिकार्‍यांवर जरा देखील वचक नाही. त्यामुळे शहरात वाहतूक नियमीत होणे, कायद्यांचे पालन होणे, रस्त्यांचा श्‍वास मोकळा होणे अशा प्रकारच्या अपेक्षा त्यांच्याकडून करणे गैरच अशी चर्चा ऐकावयास मिळते.

सर्व एकमेकांचे पाठीराखे
शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे अतिक्रमण केलेले आहेत. जर यांच्यावर कारवाई करायची ठरली तर लगेच राजकीय हस्तक्षेप होतो किंवा मनपात काम करणार्‍या अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांचे या अतिक्रमण धारकांशी हितसंबंध आहेत. त्यामुळे शहरातील पादचारी मार्ग, रिकाम्या जागा, रस्ते, विक्रीसाठी लावलेली दुकाने हे काढण्यासाठी विरोध होतो. शहर नावालाच एतिहासिक आहे. मात्र तो इतिहास टिकविण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही. सर्वच एकमेकांना पाठिशी घालत आहे. त्यामुळे प्रगतीच्या वाटा खुंटल्या आहेत.

अंधारात चाले……
शहरात तारकपूर, माळीवाडा, रेल्वे स्थानक, चौपाटी कारंजा, पारशाखुंट, या ठिकाणी भाईगिरी करणारे टोळके बसलेले असतात. त्यात रेकॉर्डवरील अनेक आरोपी देखील असतात. रात्रीच्या वेळी या ठिकाणी अर्थपूर्ण तडजोडी केल्या जातात. मात्र पोलिसांचे याकडे दुर्लक्ष असते. तर पोलीस अधिक्षकांनी चौकशी केल्यास काही पोलीस कर्मचारीच या आरोपींच्या संपर्कात असल्याचे उघड होईल.

शहरात सर्वाधिक वाहन चोरीच्या घटना घडल्या आहेत. ती वाहने रात्रीच्या वेळी सर्रास रस्त्यावर फिरताना दिसते. सकाळी हॉस्पीटल, बस स्थानके किंवा वाहन तळांवर ही वाहने लावली जातात. शहरात मनापाच्या दिव्यांखाली नेहमी अंधार असल्यामुळे अनेक गोष्टी अंधारात चालतात की काय अशी शंका निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

*