‘बाहुबली 2’ चित्रपटादरम्यान 38 मिनिटांत 132 जाहिराती, थिएटरवर कारवाईची मागणी

0

‘बाहुबली द कन्क्लुजन’ चित्रपटादरम्यान अनधिकृत जाहिराती दाखवणाऱ्या थिएटरविरोधात तक्रार करत, कारवाई करण्याची मागणी होत आहे.

‘बाहुबली 2’ च्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन, चित्रपटादरम्यान अनधिकृत जाहिराती दाखवणाऱ्या आयनॉक्स थिएटरसह राज्यातील सर्व मल्टिप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन थिएटरवर कारवाई करण्याची मागणी, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

विरोधी पक्ष नेत्यांचे पीए (स्वीय सहाय्यक) , कामगार मंत्र्यांचे पीए (स्वीय सहाय्यक) आणि आमदार बाळासाहेब सानप यांच्या पीएने (स्वीय सहाय्यक) चंद्रकांत पाटील यांना पत्र लिहिले आहे.

चित्रपटादरम्यान पाच मिनिटांपेक्षा जास्त ब्रेक नसावा किंवा ब्रेकमध्ये पाच मिनिटांपेक्षा जास्त जाहिराती नसाव्यात, असा महसूल खात्याचा नियम आहे.

परंतु हा नियम डावलून ‘बाहुबली 2’ चित्रपटादरम्यान 38 मिनिटांत 132 जाहिराती दाखवण्यात आल्या.

चित्रपट सुरु होण्याच्या आधी आणि इंटरव्हलमध्ये जाहिराती दाखवून सरकारचा कोट्यवधींचा करमणूक कर बुडवला जात आहे.

इतकंच नाही तर थिएटर व्यवस्थापनाला वारंवार तक्रार आणि विनंती करुनही जाहिराती बंद केल्या नाहीत. त्यामुळे प्रेक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे, असं तक्रारीत म्हंटले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करुन आयनॉक्ससह अशा जाहिराती दाखवणाऱ्या चित्रपटगृहांवर करण्याची मागणी पत्रात केली आहे.

LEAVE A REPLY

*