बासरीच्या सुराने एरंडोलकर मंत्रमुग्ध

0

एरंडोल |  प्रतिनिधी :  येथे श्री संत ज्ञानेश्वर संगीत अकादमीतर्ङ्गे रा.ती.काबरे विद्यालयाच्या पटांगनावर दि. २५ ङ्गेब्रुवारी रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या बासरी वादनाच्या ‘अर्पण’ कार्यक्रमास उपस्थित असलेले हजारो रसिक मंत्रमुग्ध झाले.

बासरी वादक योगेश पाटील यांनी फ्लूट सिम्ङ्गनी अंतर्गत ‘अर्पण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. बासरीवादक पं.विवेक सोनार व तबलावादक पं.किशोर पांडे यांच्या जुगलबंदीस उपस्थित रसिकांचा उत्स्पुर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमात एकाचवेळी २५ बासरी वादकांनी रचना सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.

बासरी वादक योगेश पाटील यांनी अर्पण कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरात संगीत क्षेत्राचे बिज रोवले असून आगामी काळात देखील असेच उपक्रम राबवून रासिकांना संगीत क्षेत्राची मेजवानी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पं. विवेक सोनार यांनी राग बागेश्री या श्रृंगार प्रधान रागामध्ये रुपक व तिन तालामध्ये अविट रचना सादर केल्या. पहाडी धूनने त्यांनी सांगता केली. त्यांना तबलावादक पं. किशोर पांडे यांनी साथ दिली.

बासरी व तबल्याच्या जुगलबंदीने रसिकांना संगीताची मेजवानी मिळाली. संत ज्ञानेश्वर  अकादमीचे संचालक बासरीवादक योगेश पाटील यांच्या शिष्यांनी आरंभी वंदिन, सैराट, दिल है छोटासा, पंख होते तो, इश्क सुङ्गियाना, या गाण्यांसह राग, भूपाळी, दुर्गा, यमन, भजने, राग रचना सादर केली.योगेश पाटील यांनी सादर केलेल्या राग भीमपलास व फ्लूट सिंङ्गनी मध्ये एकाचवेळी २५ बासरी वादकांनी रचना सादर करून गुरु पं.विवेक सोनार यांना मान वंदना दिली.

त्यांना सचिन जगताप, सागर सपकाळे, देवेंद्र गुरव यांनी साथ दिली.रवींद्र कुलकर्णी व जयश्री कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.प्रा.बी.ए.कुलकर्णी यांनी आभार मानले

कार्यक्रमास आ. डॉ.सतीश पाटील, नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील, माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन , नरेंद्र पाटील, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मनोज बिर्ला, यशवंतराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अमित पाटील, नगरसेवक डॉ.सुरेश पाटील, योगेश महाजन, कृणाल महाजन, उद्योजक विजय जाधव, सुनील जाधव, बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड यांचेसह हजारो रसीक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*