बारावीच्या परिक्षेत 15 कॉपीबहाददर जाळयात

0

नाशिक, ता.15, प्रतिनिधी

बारावीच्या परिक्षेत बुधवारी झालेल्या अर्थशास्त्राच्या पेपरला विभागातून 15 कॉपीबहाददर जाळयात आले. या सर्वांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती परिक्षा विभागाकडून देण्यात आली.

महत्वाची बाब म्हणजे सर्वच कॉपीबहाददर हे धुळे जिल्हयातील आहेत.

धुळे येथील शिंदखेडा केंद्रावर 2, दोंडाईचा केंद्रावर 6 तर थाळनेर केंद्रावर 7 कॉपीबहाददर आढळले. नाशिक, जळगाव, नंदुरबार येथील केंद्रावर एकही कॉपीबहाददर आढळला नाही. या सर्वांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. आतापर्यंत बारावीचे सर्वच महत्वाचे पेपर झाले असून आता सहकार, संस्कृत, समाजशास्त्र, माहितीतंत्रज्ञान हे पेपर बाकी आहेत.

25 मार्चपर्यंत बारावीची परीक्षा सुरू राहणार आहे. दरम्यान सुरवातील सोशल मिडीयावर बारावीचे पेपर फुटल्यानंतर परिक्षा विभागाकडून विशेष काळजी घेण्यात आली.

त्यानंतर सर्वच केंद्रावर सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली. याशिवाय उपजिल्हाधिकारनी शिक्षण विभागाची बैठक घेत त्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संवेदनशील केंद्रावर पोलिसांसह अन्य सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.

त्यामुळे कॉपी करणारयांवर वचक बसून त्यांचे प्रमाणही आपोआप कमी झाल्याचे चित्र आहे. परीक्षा संपेपर्यंत या सर्वच केंद्रावर सुरक्षा कायम राहणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

LEAVE A REPLY

*