बांभोरी येथील तरुणाचा संशयास्पद मृत्यू

0

जळगाव /बांभोरी येथील वाळूची वाहने भरणार्‍या मजुर तरुणाचा संशस्पाद मृत्यू झाला आहे.

निमखेडी शिवारात कुजलेल्या स्थितीत तरुणाचा मृतदेह आढळून आला.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, निमखेडी शिवारातील गट नंबर 348 जवळील दर्गाच्या पाठीमागे एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती पोलीस पाटील निर्मलाबाई प्रकाश पाटील यांनी तालुका पोलीसांना दिली.

यानंतर तालुका पोलीस ठाण्यातील सपोनि सागर शिंपी हे पोहेकॉ संजय बडगुजर, जितेंद्र पाटील, ईश्वर लोखंडे यांच्यासह कर्मचार्‍यांसोबत घटनास्थळी पोहचले.

मयत तरुणाच्या वर्णणावरुन परिसरात त्याची ओळख पटविण्यासाठी पोलीस कर्मचार्‍यांनी शोध सुरु केला.

 

LEAVE A REPLY

*