बदल्यांसाठी रदबदली नाही

0

अधीक्षक शर्मा यांचा पोलिस दलात पारदर्शकतेचा संकेत

अहमदनगर (प्रतिनिधी)- अनेक वर्षापासुन पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्यांमध्ये अर्थपुर्ण तडजोडी होत असल्याचे बोलले जाते. वशीलेबाजी नसणार्‍यांना थेट दुरचे रस्ते दाखविण्यात आले होते. त्यामुळे पोलीस दलात अद्याप नाराजी टिकून आहे. हे चित्र बदल्यासाठी पोलीस अधीक्षक रंजनकुमार यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलणार असल्याचे संकेत दिले आहे. त्यामुळे पोलीस कर्मचार्‍यांसाठी शर्मा यांच्या कार्यकाळात खरोखर अच्छे दिन येण्याची शक्यता आहे.
सन 2003 साली विश्‍वास नांगरे पाटील यांनी कर्मचार्‍यांच्या समस्या लक्षात घेऊन मागेल तेथे बदली दिली होती. त्यामुळे ते अधिकारी खाकीच्या मनात घर करून गेले. त्यानंतर 2006 मध्ये सुनिल रामानंद यांनी देखील हा फंडा राबवून कर्मचार्‍यांचे कुटुंब एकसंघ ठेऊन त्यांच्याकडून हवे तसे काम करून घेतले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत 2010 मध्ये कृष्ण प्रकाश यांनी पोलीस कर्मचार्‍यांच्या सर्व मागण्या पुर्ण केल्या. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही कर्मचार्‍याची विशेष तक्रार त्यांच्याकडे आली नाही. हवे तेथे बदली घ्या व हवे तसे काम करून दाखवा. हा फंडा पोलीस खात्यात त्यांनी यशस्वी करून दाखविला. मात्र त्यांच्यानंतर आलेल्या पोलीस अधिक्षकांनी आपला मनमानी कारभार सुरू केेले. पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांना अर्थपुर्ण तडजोडीने पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी बनविले. जिल्ह्यात कलेक्टर झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांनी पोलीस ठाण्यात स्वत:ची मक्तेदारी सुरू केली. पोलीस अधिकार्‍यांच्या जवळचा कर्मचारी दुय्यम अधिकार्‍याचा सन्मान विसरला. त्यामुळे अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोठी दरी निर्माण झाली होती. शहरातील कोतवाली, तोफखाना, भिंगार, एमआयडीसी, नगर तालुका, राहुरी, नेवासा, श्रीरामपूर, कोपरगाव, श्रीगोंदा, अकोले, संगमनेर, राहाता, शिर्डी अशा अनेक ठिकाणी 15 ते 20 वर्षे एकाच पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांनी आपले ठाण मांडले होते. या कर्मचार्‍यांनी दलाल, पुढरी, व्यापारी, सराईत गुंड, तस्कर, लाचलुचपत शाखा असे अनेक प्यादे हाती धरले होते. त्यामुळे त्यांना अधिकारीदेखील वचकून राहत होते. या पोलीस कर्मचार्‍यांची मजल इतकी होती की त्यांनी पोलीस अधिक्षकांना देखील एका जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या विरोधात किंवा बदलीत हात घातला तर अधिक्षकांपासून तर अधिकार्‍यांपर्यंत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया देखील या कर्मचार्‍यांनी राबविली आहे. त्यामुळे कोतवाली व तोफखान्या सारख्या अनेक पोलीस ठाण्यात कर्मचार्‍यांची मोठी पकड होती.

सोयीची बदली देऊ पण…
हवे ते पोलीस ठाणे मिळाले तर हवे तसे काम देखील अपेक्षीत आहे. असे न झाल्यास थेट मुख्यालयात बदली करण्यात येईल. इच्छेनुसार पोलीस ठाणे देण्याचा प्रयत्न केला तरी त्या ठिकाणी जागा नसेल तर मिळेल तेथे काम करण्याची मानसिकता कर्मचार्‍यांनी ठेवली पाहीजे.
– रंजनकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक

महिला समस्या महत्वाच्या
पोलीस खात्यात महिलांचे अनेक प्रश्‍न असतात. संसार, बाळ, पती, नोकरी, शारिरीक समस्या, आरोग्य या सर्वांमधून मार्ग काढून त्या नोकरी करीत असतात. मात्र त्यांच्या समस्यांकडे डोळेझाक केली जाते. सोयीचा बंदोबस्त मागितला तर दिला जात नाही.
ही मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पोलीस अधिक्षक लखमी गौतम यांनी हात घातला. कोतवाली व तोफखान्यासह अनेक ठिकाणी वर्षानुवर्षे नोकरी करून मलीदा गोळा करणार्‍यांच्या बदल्या केल्या. कायदा व सुव्यवस्थेला दुय्यम स्थान देणार्‍या अधिकर्‍यांच्या नियंत्रण कक्षेत बदल्या केल्या. सन 2015 साली चारशेपेक्षा जास्त कर्मचार्‍यांचे फरबदल करण्यात आले. त्यामुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. नंतरच्या काळात पोलीस अधिक्षक डॉ. त्रिपाठी यांच्या काळात कधी नव्हे इतके बदल्यांचे नगण्य गॅझेट बाहेर पडले.

LEAVE A REPLY

*