बदलीसाठी जिल्ह्यात सात हजार शिक्षक पात्र

0

     सेवा ज्येष्ठता यादी जिल्हा परिषद संकेतस्थळावर । 12 तारखेपर्यंत घेता येणार हरकती

अहमदनगर (प्रतिनिधी) – ग्रामविकास विभागाने 27 फेबु्रवारीला राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यासाठी अवघड क्षेत्र आणि सर्वसाधारण क्षेत्र अशी वर्गवारी केली आहे. या क्षेत्रानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने प्रार्थमिक शिक्षकांच्या सेवाज्येष्ठतेनुसार वर्गवारी केली आहे. यात सर्वसाधारण क्षेत्रातील मराठी आणि उर्दू माध्यमांतील सहा हजार 400 शिक्षक तर अवघड क्षेत्रातील 582 शिक्षक बदली अधिकारासाठी पात्र ठरले आहेत.

यंदा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या या ग्रामविकास विभागाने निश्‍चित केलेल्या धोरणानुसार करण्यात येणार आहेत. यासाठी अवघड आणि सर्वसाधारण क्षेत्र असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे किंवा 10 वर्षापेक्षा अधिक सेवा झालेल्या शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तयार केली आहे. या यादीत जिल्ह्यातून सहा हजार 250 शिक्षक हे मराठी माध्यमातून तर 155 शिक्षक उर्दू माध्यमातून बदलीसाठी पात्र ठरले आहेत.
अवघड क्षेत्रात सलग तीन वर्षे सेवा झालेले 582 शिक्षक असून या शिक्षकांना बदलीचा अधिकार प्राप्त झाला आहे. असे जिल्ह्यात सात हजार शिक्षक बदलीसाठी पात्र ठरले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी दिली.
या शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर बुधवारी प्रसिद्ध केली आहे. यावर ज्या शिक्षकांना काही हरकती घ्यावयाच्या असतील त्यांनी हरकती घ्याव्यात, असे आवाहन शिक्षण विभगाच्यावतीने करण्यात आले आहे.

 मराठी आणि उर्दू माध्यमाच्या संभाव्य पदाचा तपशीली शिक्षण विभागाने दिला आहे. यात उपाध्यपक पद (मराठी माध्यम) 293 पद, उपाध्यापक (उर्दू) 10 पदे, पद्वीधर शिक्षक (मराठी) 121, मुख्याध्यापक (मराठी) 181, मुख्याध्यापक (उर्दू) 1 यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

*