फेसबुक लाइक्स मिळाल्या तरी असमाधानी, ब्रिटिश सायकॉलॉजिकल सोसायटीचा अहवाल सादर

0

फेसबुक पोस्टला मिळणाऱ्या लाइक्स हा सध्या ‘प्रतिमा बांधणी’चा मुद्दा म्हणून चर्चेत असतो.

मात्र, संशोधकांनी याच्या विपरीत निष्कर्ष काढले आहेत. फेसबुकवर मिळणाऱ्या लाइक्सची संख्या वाढल्यामुळे लोकांना स्वत:विषयी वाटणारे समाधान वाटते, हा गैरसमज आहे.

तसेच लाइक्स भरमसाट असल्यास व्यक्तीचा मूड सुधारतो, असेही मुळीच नाही. नव्या संशोधनात हे समोर आले आहे.

ब्रिटिश सायकॉलॉजिकल सोसायटीच्या वार्षिक चर्चासत्रात हा संशोधन अहवाल सादर करण्यात आला. यामध्ये प्रश्नावलीच्या माध्यमातून फेसबुक वापरकर्त्यांची मनोवस्था जाणून घेण्यात आली. ३४० फेसबुक वापरकर्त्यांकडून ही प्रश्नावली भरून घेण्यात आली.

लोकप्रियतेच्या आधारे प्रतिक्रिया : सोशल मीडियावर मिळणाऱ्या प्रतिक्रिया चांगल्या असतील तर तुम्हाला आनंद वाटतो का? त्यामुळे मन:स्थिती सुधारते का? लाइक्स अधिक असतील तर समाधान वाढते का? असे प्रश्न यात विचारण्यात आले होते.

यामध्ये उत्तरदात्यांनी लिहिले की, लोकप्रियतेच्या आधारे या प्रतिक्रिया दिल्या जातात. त्यामुळे प्रतिक्रिया देेणाऱ्यांची विधाने चांगली असली तरीही त्यामुळे मूड चांगला होतो, असे नव्हे. सोशल मीडिया वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे, असे संशोधक मार्टिन ग्राफ यांनी म्हटले. मात्र, त्यामुळे मानसिक आरोग्य सुधारते, असा निष्कर्ष निघू शकत नाही. असे संशोधकांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

*