फेसबुकच्या अॅपवर नवे फिचर; व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट बटण देणार

0

फेसबुकच्या अॅपवरच आता व्हॉट्सअॅपचे शॉर्टकट बटण देण्यात येणार आहे. यासाठी सध्या फेसबुककडून चाचणी घेण्यात येत आहे. या बटणाच्या मदतीने फेसबुक वापरकर्त्यांना एका क्लिकवर व्हॉट्सअॅप सुरु करता येईल.

अमेरिकेतील प्रसिद्ध संकेतस्थळ असलेल्या ‘द नेक्स्ट’ने याबद्दलचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार, फेसबुक अॅपच्या मेन्यूमध्ये व्हॉट्सअॅपसाठीचे शॉर्टकट बटण दिले जाणार आहे. सध्या याची चाचणी सुरु आहे.

फेसबुकचे अँड्रॉईड अॅप वापरणाऱ्या काहींसाठी सध्या हे फिचर उपलब्ध आहे. सध्या हे बटण डॅनिश भाषेत आहे. मात्र फेसबुकने या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

LEAVE A REPLY

*