फळपीक विमा योजनेत धुळे जिल्याचा समावेश

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-फळपिकांचे प्रतिकुल हवामान घटकांपासून (कमी पाऊस व जास्त पाऊस) आणि हवामान धोक्यापासुन नुकसान होऊन शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते.
अशा परिस्थितीत शेतकर्‍यांचे होणारे नुकसान भरून निघावे, यासाठी प्रधानमंत्री फसल बीमा योजना अंतर्गत हवामान आधारीत फळपिक विमा योजनेस 2017-18 मध्ये शासनाने मान्यता दिली आहे.
सदर योजनेमध्ये 2017 मृग बहारमध्ये जिल्ह्याकरीता डाळिंब या फळपिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. योजना कार्यान्वित करण्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आलेली आहे.
प्रकाश सांगळे

सदर योजनेची मुदत दि.14 जुलै 2017 पर्यंत आहे. विविध वित्तीय संस्थांकडे एप्रिल ते जुलै 2017 या कालावधीत पीक कर्जासाठी अर्ज केलेल्या व ज्याची अधिसूचित फळपिकांसाठी पीक कर्ज मर्यादा मंजूर आहे, अशा सर्व शेतकर्‍यांना ही योजना सक्तीची राहील.

तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ही योजना ऐच्छिक आहे. जिल्ह्यात डाळींब फळपिकांसाठी विमा संरक्षीत रक्कम हेक्टरी 1 लाख 10 हजार रूपये व शेतकरी यांनी भरावयाचा विमा हप्ता हेक्टरी 5 हजार 500 रूपये आहे.

(डाळींब पिकासाठी जिल्ह्यातील सर्व महसुल मंडळे यात समाविष्ठ आहे.) डाळींब पिकासाठी विमासंरक्षण कालावधी कमी पाऊस (फळधारणेच्या अवस्थेत) 15 जुलै ते 15 ऑगस्ट 2017 असून कमी पाऊस अवस्थेत 17 ऑगस्ट 2017 ते 15 ऑक्टोबर 2017 व जास्त पाऊस 16 ऑक्टोबर 2017 ते 30 डिसेंबर 2017 असा आहे. शेतकर्‍यांनी शेतकर्‍यांनी कार्यवाही करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश सांगळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*