प्राथमिक शिक्षकांचा 17 जूनला मोर्चा

0
धुळे / शिक्षकांनी शिक्षण यंत्रणेच्या विरोधात असहकार आंदोलन सुरु केले असून या अंतर्गत दि. 17 जून रोजी प्राथमिक शिक्षक दुपारी 1 वाजता मोर्चा काढणार आहेत. अशी माहिती जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीतर्फे देण्यात आली आहे.
जिल्हा प्रथामिक शिक्षक समन्वय समितीची बैठक जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीला सरचिटणीस किशोर भामरे, समन्वय समितीचे सदस्य रवींद्र खैरनार, गमन पाटील, भगवंत बोरसे, शिवानंद बैसाणे, शरद सुर्यवंशी, प्रमोद पाटील, मनोहर सोनवणे, राजेंद्र बोरसे, राजेंद्र जाधव, अकिल धोबी, अनिल तोरवणे, मिलींद वसावे, ईश्वर ठाकरे, ज्ञानेश्वर महाले, बापू पारधी, राजेंद्र भामरे, शरद भामरे, भूपेंद्र वाघ, गणेश वाघ, नानासाहेब बोरसे, सुरेंद्र पिंपळे, किशोर पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील फक्त प्राथमिक शिक्षकांसाठी बदल्यांचा स्वतंत्र शासन निर्णय काढून जिल्हा परिषद कर्मचार्‍यांमध्ये भेदभाव केला आहे. असा आरोप बैठकीत करण्यात आला.

सदर शासन निर्णयात अवघड व सर्वसाधारण क्षेत्र निश्चित करण्याचे कोणतेही निकष ठरवून दिलेले नाहीत.

महाराष्ट्रातील भौगोलिक स्थिती लक्षात घेता काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवघड क्षेत्रातील शाळा निवडल्या गेल्या तर काही जिल्ह्यात एकही अवघड क्षेत्रातील शाळा दाखविली नाही.

शासन निर्णयात कोणत्याही बाबींचा स्वयंम स्पष्ट अर्थ लागत नाही त्यामुळे जिल्हा निहाय वेगवेगळा अर्थ लावून कार्यवाही सुरु झालेली आहे.

यामुळे शिक्षकांमध्ये भिती वातावरण निर्माण झाले असे बैठकीत सांगण्यात आले.

बदल्या 31 मे 2017 पुर्वी करण्याचा शासन निर्णय असूनही मुदतीत बदल्या न करता 30 जून 2017 पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

त्यामुळे 15 जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत असतांना बदल्या करणे चुकीचे होणार आहे. म्हणून राज्यातील शिक्षकांनी शिक्षण यंत्रणेच्या विरोधात असहकार आंदोलन उभे केले आहे.

त्या अंतर्गत जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक 15 जून रोजी दुपारी 1 वाजता कल्याण भवन येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

LEAVE A REPLY

*