प्राण्यांवर आधारित ‘मी अँड पॉ’ ही वेबसिरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

पूजा सावंतने क्षणभर विश्रांती, सतरंगी रे, दगडी चाळ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज एक अभिनेत्री म्हणून तिने मराठी चित्रपटसृष्टीत तिचे चांगलेच स्थान निर्माण केले आहे.

पूजा ही एक चांगली अभिनेत्री असण्यासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारी अभिनेत्री आहे.

पूजाला सामाजिक कार्य करण्याची आवड आहे. तिला कुत्र्यांविषयी तर खूप प्रेम आहे. रस्त्यांवरील कुत्र्यांविषयी तर तिला प्रचंड आपुलकी आहे. तिने आणि तिच्या बहीणीने आतापर्यंत रस्त्यावरील अनेक कुत्र्यांचा सांभाळ केला आहे. दादर माहीम परिसरातील कुत्र्यांना या बहिणी अनेक वेळा डॉग फूड देतात.
पूजाच्या भावाला गटारात पडलेले एक कुत्र्याचे पिल्लू दिसले होते. त्याने ते घरी आणले होते. गटारात पडल्यामुळे त्याच्या पायाला चांगलीच दुखापत झाली होती. त्यामुळे पूजाच्या भावाने त्याला डॉक्टरांकडे नेवून त्याच्यावर उपचार केले

प्राण्यांवर आधारित मी अँड पॉ ही बेवसिरिज नुकतीच सुरू झाली असून या वेबसिरिजच्या पहिल्या भागात प्रेक्षकांना पूजा आणि तिच्या भावाने आणलेल्या छोट्याशा कुत्र्याच्या पिल्लाची ही गोष्ट पाहायला मिळणार आहे. 

LEAVE A REPLY

*