पोलीस अधीक्षकांनी पदभार स्विकारला

0

जळगाव / जळगाव जिल्हा पोलिस दलाचे नवनिर्वाचित जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सकाळी 11.30 वाजता यांनी पदभार स्विकारला.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग, डॉ. जालिंदर सुपेकर उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांची नाशिक येथील पोलिस अकादमीत बदली झाली आहे.

त्यामुळे त्यांच्या जागी नाशिक शहर उपायुक्त दत्तात्रय कराळ यांची नियुक्ती झाली.

तसेच अप्पर पोलिस अधिक्षका मोक्षदा पाटील यांची वाशिम येथे बदली झाली त्यांच्या जागी औरंगाबाद ग्रामीण येथील पैठणचे बच्चनसिंग यांची बदली झाली.

बच्चनसिंग यांनी बुधवारी मोक्षदा पाटील यांच्याकडून पदभार स्विकारला.

दरम्यान आज नवनिर्वाचित जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पोलिस अधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याकडून पदभार स्विकारला.

याप्रसंगी अप्पर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांच्यासह पोलिस दलातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती. सकाळीच पोलिस अधीक्षक कराळे यांनी पदभार स्विकारताच कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

*