पैशांच्या लालसेपोटीच केला खून; येवल्यातील खुनाची उकल

0
येवला : येवला तालुक्यातील भुलेगाव शिवारात झालेल्या खुन पैशांच्या लालसेपोटीच झाल्याचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तिघा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांनीच खून केला असल्याची कबुलीदेखील दिली आहे.

२८ एप्रिल २०१७ ला तालुक्यातील  न्याहारखेडा येथील रहिवासी लालखा गुलजार खा मुलतानी (वय ७६) त्यांच्या दुचाकीवरून वैजापूर येथून परत येत असतांना अज्ञाताकडून धारदार हत्याराने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी करत ठार करण्यात आले होते. यासंदर्भात येवला तालुका पो स्टे ला गुरन ६६/२०१७ भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल होता.

सदर घटनेबाबत नाशिक ग्रामीणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासकार्य सुरु होता. झालेल्या हल्ल्याबाबत व घटनास्थळावरील परिस्थितीची सविस्तर माहिती घेऊन खबऱ्यांमार्फत मिळविलेल्या गुप्त माहितीच्या आधारे न्याहारखेडा येथील संशयित १) बशीर हारून अन्सारी (वय २१, रा. न्याहारखेडा, ता. येवला) २. शाहरुख मोहम्मद पठाण (मुलतानी ), वय २१, रा. सदर यांना स्थागुशाचे पथकाने सुकी, ता येवला येथून ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या संशयितांना पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी त्यांचा साथीदार ३) कलीम युनूस मुलतानी, वय २०, रा. न्याहारखेडा, ता येवला यांच्यासह खुनाचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, वरील तिन्ही आरोपींनी मयत लालखा गुलजार खा मुलतानी यांना जनावरे खरेदी करून देतो असे सांगून त्यांना अंदरसूल भुलेगाव परिसरातील फॉरेस्टचे जागेत सुनसान नेत त्यांच्या डोक्यावर व तोंडावर लाकडी खिळे असलेला दांडा व लोखंडी सळईने मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते.

दरम्यान, लालखा गुलजार यांना ठार केल्यानंतर त्यांच्या खिशातील रोख रक्कम काढून त्यांचा मोबाईल तोडून जंगलात फेकून दिला होता.

 

LEAVE A REPLY

*