पेन्शनरला गंडविले; बिल्डरविरुध्द गुन्हा

0

दुसर्‍याचा प्लॉट दाखवून केली फसवणूक 

अहमदनगर (प्रतिनिधी)– दुसर्‍याच्या मालकीचा प्लॉट दाखवून तो विकत देतो असे सांगून एका पेन्शनरला बिल्डरानेच साडेतीन लाख रुपयांचा चुना लावला. फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी बिल्डरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मल्हार चौकातील बिल्डरच्या ‘जीएमआर’ कार्यालयात ही फसवणूक झाली.
घनशाम मारुती रोहोकले (रा. आनंदविहार, मल्हार चौक, स्टेशन रोड) असे गुन्हा दाखल झालेल्या बिल्डरचे नाव आहे. पंडित गंगाराम घोरपडे (रा. आनंदनगर, मल्हार चौक) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठाचे नाव आहे. घोरपडे यांना घर बांधणीसाठी प्लॉट घ्यायचा होता. त्यासाठी त्यांनी रोहोकले यांच्याकडे विचारपूस केली. रोहोकले यांनी त्यांना प्लॉट दाखविले. ते स्वत:चे असल्याचे खोटे सांगितले. हा प्लॉट 13 लाख 19 हजार रुपयांचा सौदा फिक्स झाला. त्यापैंकी साडेतीन लाख रुपये घोरपडे यांनी रोहोकले यांना दिले. 13 जानेवारी 2017 रोजी साडेतीन लाख रुपयांचा इसारपावतीही झाली. बाकीचे पैसे प्लॉट ताब्यात दिल्यानंतर घेऊ असे घोरपडे यांना सांगण्यात आले. पेन्शनरला गंडविले
घोरपडे यांनी प्लॉट खरेदीसाठी तगादा लावल्यानंतर रोहोकले यांनी इसारपावती केलेला प्लॉट हा दुसर्‍याचाच असल्याचे समोर आले. रोहोकले याने फसवणूक केल्याचे निदर्शनास येताच घोरपडे यांनी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली.

LEAVE A REPLY

*