पॅरासिटेमॉलपेक्षा बिअर प्रभावी पेनकिलर; यूकेमधील संशोधकांचा दावा

0

उन्हाळ्यात थंडाव्यासाठी बिअर रिचवणाऱ्या मद्यप्रेमींना आता आपली बाजू भक्कम करण्याचं आणखी एक कारण मिळालं आहे. एका संशोधनातून समोर आलं आहे.

यूकेमधील ग्रीनविच युनिव्हर्सिटीतील संशोधकांनी सुमारे 400 जणांवर केलेल्या 18 सर्वेक्षणांमध्ये पॅरासिटामॉलपेक्षाही बिअर ही प्रभावी वेदनाशामक असल्याचे समोर आले आहे.

बिअर प्यायल्यामुळे मेंदूतील चेतातंतूंवर परीणाम होऊन वेदना शमवता येतात का, याचा अभ्यास करण्यात आला. त्यावेळी बिअरचं प्रमाण जितकं जास्त, तितक्या सहभागींना वेदना कमी जाणवल्याचं संशोधकांच्या समोर आलं

‘अल्कोहोल ही अत्यंत प्रभावी वेदनाशामक असल्याचे सबळ पुरावे मिळाले आहेत.’ असं ग्रिनविच युनिव्हर्सिटीच्या ट्रेवॉर थॉमसन यांनी म्हटल्याचं ‘द सन’ या ब्रिटीश वृत्तापत्राने छापलं आहे. विशेष म्हणजे पॅरासिटामॉलशी तुलना करता बिअर अधिक प्रभावी असल्याचं समोर आलं आहे.

वैद्यकीयदृष्ट्या वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी बिअर ही परिणामकारक असल्याचं संशोधनात समोर आलं आहे. मात्र दीर्घकालीन वेदना शमवण्यासाठी बिअर हा उपाय नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

LEAVE A REPLY

*