पु. ना. गाडगीळ आणि सन्सचे नाशिकमध्ये आणखी एक दालन

0
नाशिक  : तब्बल 185 वर्षांची परंपरा असलेल्या आणि सोने-चांदी व हिरे दागिन्यांच्या व्यवसायातील देशातील आघाडीचा ब्रँड पु. ना. गाडगीळ आणि सन्स नाशिकमध्ये आपले दुसरे दालन 23 एप्रिल रोजी सुरू करीत आहे.

नाशिक रोडवरील स्टार झोन मॉलमध्ये या दालनाचा शुभारंभ करण्यात येणार असून  विस्तारणाऱ्या नाशिकबरोबर आजूबाजूच्या गावांतील ग्राहकांना याचा लाभ घेता येणार आहे.

याबाबत अजित गाडगीळ म्हणाले, नाशिक हे दागिन्यांची महत्त्वाची बाजारपेठ असून ती वाढत आहे. त्यामुळेच ग्राहकांच्या आग्रहानुसार येथे आमचे सर्वांत मोठे दुसरे दालन सुरू करीत आहोत. येथे ग्राहकांना सोने-चांदी व हिऱ्याच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार याठिकाणी उपलब्ध होणार आहेत. डिझायनर ज्वेलरीबरोबर कस्टमाइज एक्सक्लूसिव्ह डिझायनर ज्वेलरी हे विशेष आकर्षण आहे. टेम्पल ज्वेलरी क्लासिक्स, फर्स्ट लव्ह-फर्स्ट हायमंड, रोझ गोल्ड, बाजीराव मस्तानी, मोहेंजोदारो आदी नवी कलेक्शन येथे असणार आहेत.

दागिन्यांच्या व्यवसायाबरोबर पु. ना. गाडगीळ आणि सन्स नेहमीच कलेला प्रोत्साहन देतो. नाशिकमध्येही कलोपासक असल्याने दुसऱ्या दालनात आर्ट गॅलरी सुविधा असून या ठिकाणी उदयोन्मुख व प्रथीत यश कलाकारांना फोटोग्राफी वा पेंटिंग्स कला सादर करता येणार आहे. कलादालनासाठी कलाकारांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नाही असेही गाडगीळ म्हणाले.

तरुण ग्राहकवर्ग डोळ्यासमोर ठेऊन www.onlinepng.com हे ऑनलाइन पोर्टल सुरू केले असून त्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगण्यात आले आहे. बदलत्या आवडीनुसार व आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन पूर्ण भारतात पोचण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही पु. ना. गाडगीळ आणि सन्सच्या भागीदार रेणू गाडगीळ यांनी सांगितले.

येणाऱ्या अक्षय्य तृतीयेचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ग्राहकांच्या हिताची सण आनंदाचा योजना आणली आहे. यामुळे ग्राहकांना सोन्याचा कमी भाव मिळविण्याची संधी मिळेल. यामध्ये सोन्याची 27 एप्रिलपर्यंत नोंदणी करावी लागेल. ग्राहकांनी मागणी नोंदविल्यास बुकिंगच्या दिवशी असलेला भाव किंवा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी (28 एप्रिल) दुकानातील विक्रीचा भाव या पैकी जो कमी असेल त्या भावात सोने दिले जाईल. मागणी नोंदविताना व्हॅटसह (मूल्यवर्धित कर) संपूर्ण रक्कम अॅडव्हान्स म्हणून भरावी लागेल असे सीईओ अमित मोडक यांनी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*