पुर्ववैमनस्यातून एकाचा दगडाचा ठेचून खून

0

                                     

पिंपळनेर / मागील भांडणाच्या कारणावरुन एकाचा दगडाने व चाकुने वार करून निर्घृण खून करण्यात आला.

याप्रकरणी विजय लक्ष्मण पवार याच्याविरूध्द पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आज दि, 10 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास साक्री तालुक्यातील जामखेल येथे ही घटना घडली.

या घटनेची माहिती अशी की, विजय लक्ष्मण पवार याने सुमारे 6 वर्षापुर्वी शांताराम थैल यांचा पुतण्या सुरेश मोतीराम थैल याची पत्नी अंजनाबाई हिस फुस लावून पळवून नेले होते.

त्यावरुन विजय लक्ष्मण पवार व सुरेश मोतीराम थैल यांच्यामध्ये भांडण झाले होते. त्याबाबत पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून सुरेश थैल व विजय लक्ष्मण पवार यांच्यामध्ये वाद होते.

आज दि.5 मे 2017 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास सुरेश मोतीराम थैल हा टेकडीवर गुरे चारत होता. त्यावेळी विजय लक्ष्मण पवार हा त्याच्या शेताकडून सुरेश थैलजवळ गेला.

तेथे विजय लक्ष्मण पवार याने दगडाने सुरेशच्या डोक्यात मारले. त्यानंतर सुरेश घाबरुन पळू लागला, तेव्हा विजय पवार याने पळत जावून खिशातून चाकू काढून सुरेशच्या पोटावर व छातीवर वार केले.

सुरेशला मारल्यानंतर विजय तेथून पळाला. यावेळी सुरेशच्या शर्ट रक्ताने संपूर्ण माखलेला होता. सुरेशचा पुतण्या उमेश रमेश थैल व ऊलूशा ठाकरे हे मोटार सायकलने तेथे आले व त्यांनी मोटार सायकलने रोहड येथे दवाखान्यात दाखल केले.

मात्र डॉक्टरांनी सुरेशला मयत घोषीत केले.

LEAVE A REPLY

*