पीएम मोदीच आम्हाला वाचवू शकतील : मेहबुबा मुफ्ती

0

सध्याच्या कठीण परिस्थितीमधून राज्याला कुणी बाहेर काढू शकत असेल तर ते फक्त पंतप्रधान मोदी आहेत.

मोदींनी कोणताही निर्णय घेतला तरी त्याला संपूर्ण देशाचा पाठिंबा असेल, असे मुफ्ती यांनी म्हटले.

गेल्या काही महिन्यांपासून काश्मीरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मेहबुबा मुफ्ती यांचे हे विधान महत्त्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे.

महिलांच्या एका कार्यक्रमात त्यांनी काश्मीरच्या वाईट होत चाललेल्या परिस्थितीवर मोदीच तोडगा काढू शकतील अशी उमेद केली आहे. या कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या, “काश्मीरमध्ये परिस्थिती वाईट होत असल्यास त्याचे दुष्परिणाम जम्मू आणि लद्दाकमध्ये सुद्धा दिसून येतील. काश्मीरचा प्रश्न 70 वर्षे जुना आहे.

LEAVE A REPLY

*