पावरलूम यंत्रात अडकून बाल कामगाराचा मृत्यू

0

धुळे / शहरातील वडजाई रोडवरील पावरलूम यंत्रावर बारा वर्षीय बालक काम करीत असताना अचानक यंत्रात अडकल्याने त्याचा मृत्यू झाला.

याबाबत पोना एस.डी.पाटील यांनी शहर पोलिस ठाण्यात माहिती दिली. त्यावरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

power loom machine ,संग्रहित छायाचित्र

याबाबत माहिती अशी की, शहरातील वडजाई रोडवर शकील अहमद अकीलअली, रा.आझादनगर यांच्या मालकीचा पावरलूम कारखाना आहे.

या कारखान्यातील पावरलूम यंत्रावर दि.3 मे रोजी रात्री 9.30 वाजता असीफ जावेद शेख (वय 12), रा.लल्लूचे हॉटेलजवळ, धुळे, हा काम करीत असताना अचानक पावरलूम यंत्रात अडकला.

यंत्राजवळ रक्ताचे थारोळे जमा झाले. गंभीर जखमी झालेल्या असीफला नगरसेवक अमीन पटेल व साजीद अन्सारी यांनी भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात उपारासाठी दाखल केले.

तेथे डॉ.अश्विनी भामरे यांनी असीफ शेखला तपासून रात्री 10.40 वाजता मृत घोषित केले.

याबाबत पोना एस.डी.पाटील यांनी प्रथमदर्शी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सहाय्यक उपनिरीक्षक व्ही.सी.मोरे हे करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*