पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही : बारस्कर

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – शेतकर्‍यांनी केलेल्या आत्महत्या नसून सरकारने केलेल्या हत्याच आहेत. या सरकारमधील मुख्यमंत्री व मंत्र्यांचे हात शेतकर्‍यांच्या हत्येने रक्ताळलेली आहेत. अशा हत्या करणर्‍या हातांना देशाचा पवित्र तिरंगी झेंडा फडकविण्याचा कोणताही अधिकार नाही, यामुळे पालकमंत्र्यांना ध्वजारोहन करु देणार नाही, असा इशारा ह.भ.प. अजय महाराज बारस्करयांनी दिला आहे. शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नासंबंधीत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

 

 

या निवेदनाद्वारे संघटनेने सरकारवर ताशेरे ओढत 14 तारखेला चक्काजाम करण्याचा तसेच 15 ऑगस्टरोजी पालकमंत्र्यांना ध्वजारोहन करु देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

 

 

शेतकरी संपाच्या माध्यमातून विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. याची परिणती म्हणून सरकारने नरमाईची भूमिका घेत अंशत: अनेक विषय पूर्ण करण्याची तयारी दाखविली. परंतू आता बरेच दिवस उलटूनही सरकारकडून अश्वासनापलीकडे काहीच मिळालेले नाही.

 

 

यामुळे 14 ऑगस्टला विविध संघटनांच्यावतीने संपूर्ण राज्यभर चक्का जाम आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.

 

आ. बच्चू कडू, रघनाथ दादा पाटील, बाबा आढाव, अजित नवले, शेतकरी समन्वय समिती, प्रहार संघटना, शेतकरी संघटना, जिल्हा हमालसंघटना, कामगार संघटना, किसान सभा, कम्यनिस्ट पार्टी,बळीराजा शेतकरी संघटना या सर्व संघटना येत्या 14 तारखेला चक्काजाम आंदोलन करणार आहेत. सरकारने शेतकर्‍यांना सरसकट कर्जमुक्ती दिलेली नाही. तसेच स्वामिनाथन आयोगात कुठलीही कार्यवाही केलेली नाही. त्याचबरोबर 9 ऑगस्ट 2017च्या मराठा क्रांती मोर्चामध्ये शेतकर्‍यांच्या मागण्या संबंधी कोणतेही भाष्य केलेले नाही.

 

 

नगर शहरातील मार्केटयार्डसमोरील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यााला अभिवादन करुन वरील सर्व संघटना चक्का जाम आंदोलन करणार आहेत. तसेच 15 ऑगस्टला होणरे शासकीय ध्वजारोहन पालकमंत्र्यांच्या हस्ते न करता ते ध्वजारोहन जिल्हाधिकारी, स्वातंत्र्यसैनिक किंवा शेतकर्‍यांच्या हस्ते करण्यात यावे अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे.

 

 

जून 2017 पर्यंत शेतकरी सरसकट कर्ज मुक्त झाला पाहीजे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागु कराव्यात, पेरणी ते कापणी पर्यंतची सर्व कामे रोजगार हमीतून करण्यात यावी.शेतमालावरील संपूर्ण निर्यात बंदी उठविण्यात यावी. शेतीकरी विधवांना पेन्शन व आत्महत्याग्रस्त पाल्यांना सरकारी नोकरीत आरक्षण देण्यात यावे.

 

 

हमाल, माथाडी, कामगार व अपंगांचे सर्व प्रश्न सोडविण्यात यावे. या मागण्या सरकारने तत्काळ पुर्ण कराव्यात अन्यथा हे आंदोलन यापुढेही उग्ररुप धारण करुन मोठ्या प्रमाणत मंत्रालयापर्यंत चक्काजाम करण्यात येईल. असे प्रहार वारकरी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, अजय महाराज बारस्कर यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

*