पालकमंत्री जयकुमार रावलांनी घेतला नंदुरबार शहरातील परिस्थितीचा आढावा

0
नंदुरबार । प्रतिनिधी-राज्याचे रोजगार हमी योजना व पर्यटन विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार शहराच्या विविध भागांना भेटी देवून कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला.
वैयक्तिक वादामुळे शहरात शास्त्री मार्केट, सुभाष चौक, मंगळबाजार, भाजीमंडई, मन्यार मोहल्ला, सोनार खुंट या भागात शनिवारी दगडफेक व जाळपोळ करण्यात आली होती.
पोलीसांनी वेळीच हस्तक्षेप करुन अवघ्या दोन तासात दंगल नियंत्रणात आणली या घटनेमुळे आज शहरात तणावपूर्ण शांतता होती.

या पार्श्वभुमीवर पालकमंत्री श्री. रावल यांनी घटनास्थळांची पाहणी केली. यावेळी माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र डहाळे आदि उपस्थित होते.

सर्वप्रथम शासकीय निवासस्थानी कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेवून शास्त्री मार्केट आणि मन्यार मोहल्ला या भागांना भेटी देवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली.

त्यानंतर मृत शब्बीर शेख मासूम पिंजारी यांच्या निवासस्थानी भेट देवून त्यांच्या कुटूंबियांचे सात्वन केले.

LEAVE A REPLY

*