पाकिस्तानमध्ये तेलाच्या टँकरला आग लागून 123 जणांचा मृत्यू

0
पाकिस्तानमध्ये तेलाच्या टँकरला आग लागून 123 जणांचा मृत्यू झाला आहे.तर 100 जण जखमी झाले आहेत.
पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील बहावलपूर शहरात हा अपघात झाला आहे.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी या संदर्भातील वृत्त प्रसारित केले आहे.
या वृत्तानुसार बहावलपूरमधील अहमदपूर शरिका येथे राष्ट्रीय महामार्गावर तेल वाहून नेणारा टँकर पलटला. त्यानंतर या टँकरला आग लागली.  हा टँकर भरधाव वेगाने जात असल्याने उलटल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टँकर उलटल्यानंतर तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांनी टँकरजवळ गर्दी केली.
त्याचदरम्यान ही आग लागल्याने लोक मोठ्या प्रमाणावर मृत्यूमुखी पडल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*