पाकिस्तानच्या मंत्रिमंडळात हिंदू खासदाराचा समावेश

0

पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी यांच्या कॅबिनेटने शुक्रवारी शपथ घेतली.

या मंत्रिमंडळात खासदार दर्शन लाल या हिंदू खासदाराचाही समावेश करण्यात आला आहे.

मागील २० वर्षांहून अधिक काळानंतर प्रथमच एका हिंदू नेत्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्राध्यक्ष ममनून हुसेन यांनी ४७ खासदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. यामध्ये १९ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे.

एका सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दर्शन लाल यांना पाकिस्तानच्या चारही प्रांताच्या समन्वयासाठी जबाबदारी देण्यात आली आहे.

६५ वर्षीय लाल हे व्यवसायाने डॉक्टर आहेत. सध्या ते सिंध प्रांतातील मीरपूर मथेलो शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात. वर्ष २०१३ मध्ये ते पीएमएल-एन पक्षाकडून अल्पसंख्यांक कोट्यातून दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले होते.

LEAVE A REPLY

*