पहिल्याच बैठकीत विषयांचा पाऊस

0

शिक्षण समिती : गुणवत्तेवर तडजोड करण्याचा निर्णय 

 

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या शाळा अन् विद्यर्थ्यांची गुणवत्तेबाबत कोणत्याही परिस्थितीत तडजोड न करण्याचा निर्णय शिक्षण समितीच्या पहिल्याच मासिक सभेत घेण्यात आला आहे. यासह जि.प. शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी यांच्याशी निगडीत विषयांचा पाऊसच या बैठकीत झाला. शैक्षणिक धोरण, शिक्षकांसाठी आचारसंहिता, गुणवत्तेचा ग्रोथ आराखडा आणि अन्य मुलभूत विषयावर सभेत सकारात्मक चर्चा झाली.

 
उपाध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली झालेली बैठकीत लवकरच प्राथमिक शिक्षकांच्या संघटना आणि शिक्षण समितीचे सदस्य यांची समन्वय सभा घेण्याचा निर्णय झाला. जून महिन्या शाळा सुरू झाल्यावर शिक्षकांनी केवळ गुणवत्ता वाढ यावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर द्यावा, यासाठी ही समन्वय बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सदस्य राजेश परजणे यांनी दिली.

 
जिल्हा परिषदेच्या शाळांना व्यवसायिकऐवजी कृषी दराने वीज आकारणी व्हावी, असा ठराव सभेत झाला. लवकरच शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची बैठक घेवून शैक्षणिक गुणवत्तेचा ग्रोथ आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात गुणवत्ता वाढ, अभ्यासक्रमाची पुर्व तयारी, शाळा भेटीचे नियोजन, शालेय पोषण आहाराचा दर्जा यांचा समावेश राहणार आहे. शाळा भेटीदरम्यान समोर येणार्‍या उणिवा आणि त्रुटींवर शिक्षण समितीच्या पुढील बैठकीत चर्चा करण्यात येईल.

 
शिक्षण समितीने शिक्षकांना काटेकोरण शाळेच्या वेळा पारपडण्याच्या सुचना दिल्या आहेत. शाळेच्या वेळेत शिक्षकांनी मोबाईल वापरू नये, व्यसन करू नये, अशा सुचना यावेळी करण्यात येत शिक्षकांसाठी आचारसंहिताही आखण्यात आली आहे. शाळेत शिक्षकांना ओळखपत्र सक्तीचे करण्यात आले असून शिक्षकांनी पहिल्या आणि तिसर्‍या शनिवारी जिल्हा परिषद, पंचायत समिती जाण्याची परवानी त्यांना देण्यात आली आहे. ज्या शाळेत 150 अधिक विद्यार्थी आहेत, त्या ठिकाणी लिपिक संवर्गातील पद निर्मिती करण्याचा ठराव करण्यात आला असल्याची माहिती परजणे यांनी दिली.

 
शाळेच्या आवारात असणारे वीजेचे पोल, तारा स्थलांतर करण्याचा प्रस्ताव तयार करून ऊर्जा मंत्र्याकडे पाठवण्याचा निर्णय झाला. शाळेत तक्रारपेटी ठेवण्याच्या निर्णयाचे स्वागत सदस्य जालिंदर वाकचौरे यांनी केले. बैठकीला सदस्य परजणे, विमल आगवण, वाकचौरे, मिलींद कानवडे, सभापती राहुल झावरे, शिक्षणाधिकारी अशोक कडूस, लक्ष्मण पोले, सुनंदा ठुबे आदी उपस्थित होते.

 

 शैक्षणिक वर्षे सुरू झाल्यानंतर प्रत्येक शाळेत आनंदी बाजार, शैक्षणिक सहली, स्नेहसंमेलने, वैज्ञानिक सहली काढण्यात येणार आहेत. मोडकळीस आलेल्या शाळा खोल्यांच्या निर्लेखनास परवानगी मिळाली असून गरज असणार्‍या ठिकाणी तातडीने वर्ग खोल्या देण्यात येणार आहेत. 

 

शिक्षक आणि अधिकारी यांचे गुणवत्तेची कामगिरी सुधारल्यास, चांगली झाल्यास त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच्या अनुभवाची माहिती जाणून घेण्यात येणार आहे. मात्र, गुणवत्तेकडे दुर्लक्ष करणार्‍यांची गय न करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. राहाता तालुक्यात शिक्षण विभागाचा आकृतीबंध मंजूर नाही. हा आकृतीबंध तातडीने मंजूर करण्याचा ठरावही यावेळी करण्यात आला.

 

 केंद्र शाळांची पुर्नरचना करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला असून यात 1 केंेद्रात किमान 15 शाळा असाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. अध्यक्षांच्या परवानगीने या पुढे शिक्षण समितीच्या बैठका प्रत्येक तालुक्यात होणार आहेत. याची सुरूवात पारनेर तालुक्यापासून होणार आहे. 

LEAVE A REPLY

*