‘पहरेदार पिया की’ मालिका बंद करा; ‘Change.org’ वर याचिका दाखल

0

सोनी टीव्हीवरील ‘पहरेदार पिया की’ ही मालिका कथानकामुळे नेहमीच चर्चेत राहिली आहे.

एका १८ वर्षीय तरूणीचं ९ वर्षांच्या मुलाशी होणारं लग्न आणि परिस्थितीमुळे निर्माण झालेलं या नात्यातील रहस्य हा या मालिकेचा विषय आहे.

आता या मालिकेवर बंदी आणण्यासाठी Change.org या वेबसाइटवरुन माहिती व प्रसारण मंत्री स्मृती इराणींकडे याचिका दाखल करण्यात आली आहे.

‘Change.org’ या वेबसाइटवर मानसी जैन यांनी ही याचिका दाखल केली. त्यानंतर सुमारे १८ हजार लोकांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे.

‘नऊ वर्षांचा मुलगा त्याच्यापेक्षा दुप्पट वय असलेल्या मुलीशी लग्न करतो, तिच्या भांगात कुंकू भरतो असं या मालिकेत दाखवण्यात आलं आहे. रात्री ८.३० वाजता ही मालिका प्रसारित होते.

प्राइम टाइममध्ये असल्याने प्रेक्षकांच्या मनावर कशाप्रकारे ही मालिका कशाप्रकारे ठसा उमटवतेय याचा विचार करावा. या मालिकेवर बंदी आणावी अशी आमची मागणी आहे.

अशा प्रकारच्या मालिकांचा आमच्या मुलांवर काही परिणाम होऊ नये अशी आमची इच्छा आहे,’ असं या याचिकेत म्हटलं आहे.

LEAVE A REPLY

*