पशुवैद्यकीय कार्यालयाला नोटीस

0

साक्री /महाराष्ट्र दिनी पशुवैद्यकीय लघु चिकित्सालय तालुका कार्यालयातील प्रशासनाने ध्वजस्तंभाची डागडुजी न करता तुटलेल्या कठड्यावर ध्वजारोहण केल्याप्रकरणी गटविकास अधिकारी सी. आर. भावसार यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.

दरम्यान तहसील कार्यालायकडूनही पशुवैद्यकीय कार्यालयाला कारणेदाखवा नोटीस देण्यात आली आहे.

दै. ‘देशदूत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर सर्वच स्तरातुन या घटनेची नोंद घेण्यात आली.

तसेच तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयात वरिष्ठ अधिकार्‍यांचे दूरध्वनीवरून संपर्क होत असल्याने या दोन्ही कार्यालयातील अधिकार्‍यांची धावपळ होत होती.

नागरिकांमध्येही या घटनेविषयी उलटसुलट चर्चा घडून येत होती. यामुळे तडकाफडकी पंचायत समिती कार्यालयाकडून घटनेच्या चौकशीचे आदेश गटविकास अधिकार्‍यांकडून देण्यात आलेत.

 

LEAVE A REPLY

*