परवानगी न घेताच रस्त्यावर मंडप बांधणी

0

अहमदनगर (प्रतिनिधी) – तोंडावर येऊन ठेपल्या गणेश उत्साव धुमधडाक्यात करण्यासाठी मंडळे सरसावली असून नगर शहरात मंडप उभारणी सुरू झाली आहे. महापालिकेच्या प्रचलित धोरणामुळे उत्सव काळात वाहतूक कोंडी होईल असे चित्र दिसू लागले आहे. अहमदनगर (प्रतिनिधी) – तोंडावर येऊन ठेपल्या गणेश उत्साव धुमधडाक्यात करण्यासाठी मंडळे सरसावली असून नगर शहरात मंडप उभारणी सुरू झाली आहे. महापालिकेच्या प्रचलित धोरणामुळे उत्सव काळात वाहतूक कोंडी होईल असे चित्र दिसू लागले आहे. महापालिकेने सार्वजनिक उत्सवात उभारवयाच्या मंडपाबाबत धोरण ठरवून परवानगी द्यावी असे आदेश उच्च न्यायलयाने दिले आहे. पण अजून धोरच ठरलेले नाही, त्यामुळे प्रचलित पध्दतीनुसार परवानगी दिली जाईल असे महापालिकेने स्पष्ट केले. शहरातील तोफखाना, नेप्ती नाका चौक, पटवर्धन चौकी यासह विविध भागात मंडप उभारण्याच्या कामास सुरूवात झाली आहे. गतवर्षी प्रमाणे गणेश मंडळाने नियमानुसार परवागी घेणे आवश्यक आहे. मात्र मागील वर्षी मंडप उभारणी पूर्ण झाल्यावर अनेक गणेश मंडळानी परवागीसाठी अर्ज सादर केले. तर अन्य गणेश मंडळावर दंडात्मक कारवाई केली. तसेच ज्या गणेश मंडळानी विना परवागी मंडप उभारणी केली त्यांना परवागी न देण्याचा निर्णय महापलिकेने घेतला आहे. यंदा परवागी न घेणार्‍या गणेश मंडळावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शहरातील एकही मंडळाने आजपर्यंत मंडप उभारणीसाठी महापालिकेकडे परवागी मागितलेली नाही. मात्र प्रत्यक्षात मंडप उभारणी सुरू आहे. ज्या मंडळानी विना परवागी मंडपाची उभारणी केली त्या मंडळावर कडक करवाई करून गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अतिक्रमण प्रतिबंधक विभागकडून पुढील काही दिवसात असे मंडप काढून टाकण्यात येणार आहे, अशी माहिती अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी नगर टाइम्सशी बोलतांना दिली.

LEAVE A REPLY

*