परदेश दौऱ्यांची माहिती सार्वजनिक करा : कपिल मिश्रा

0

आम आदमी पक्षाला मिळणारा निधी हवाला व्यवसायाशी संबंधित कंपन्यांकडून येत असल्याचा आरोप करत मिश्रा यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे.

कपिल मिश्रा यांनी अरविंद केजरीवाल यांच्या नावाचा उल्लेख अरविंद ‘हवाला’ केजरीवाल असा केला आहे.

ट्विटरच्या माध्यमातून कपिल मिश्रा यांनी केजरीवालांवर आरोप केले आहे.

दिल्लीचे माजी जलमंत्री असलेल्या मिश्रा यांनी रशिया दौऱ्याबद्दलची माहिती हवाला व्यवसायाशी संबंधित असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला आहे.

केजरीवालांनी परदेश दौऱ्यांची माहिती सार्वजनिक केली नाही, तर आपण एका एका दौऱ्याची माहिती सार्वजनिक करु, असा इशारा कपिल मिश्रा यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

*