पतंजली सुरु करणार रेस्तराँ चेन

0

शाकाहारप्रती जागतिक आकर्षण पाहता रामदेव बाबा देशभरात क्विक सर्व्हिस रेस्तराँ (क्यूएसआर) सुरू करण्याची तयारी करत आहेत.

केएफसी आणि मॅकडॉनल्डससारख्या दिग्गज बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या फास्ट फूड चेनला टक्कर देण्याची तयारी करत आहेत.

या रेस्तराँमधून ४०० हून अधिक रेसिपी मिळतील. त्याचबरोबर पतंजलीची जिन्स आणि क्रीडा पोषाख आणि साहित्य बनवण्याची योजनाही आहे.

भारतीयांना शाकाहरी भोजनापेक्षा स्वादिष्ट आणि हितकारक काही असूच शकत नाही, म्हणून आम्ही लोकांना पर्याय देत आहोत.

आम्ही आमच्या मेन्यूची उत्तर भारतीय किंवा दक्षिण भारतीय अशी विभागणी करणार नाही अशी माहिती रामदेव बाबा यांनी दिली.

LEAVE A REPLY

*