पचन संस्थेचे काम सुरळीत चालावे म्हणून…

0

चयापचय तुमच्या शरीरात चालणारी एक जैविक प्रक्रिया आहे आणि तुमच्या शरीरात जेवण कसे पचते   या विषयात याची एक महत्वपूर्ण भूमिका आहे.

एक चांगलं चयापचय तुम्हाला निरोगी ठेवतो. पण जर चयापचयमध्ये  गड़बड़ झाली तर मात्र सगळंच बिघडतं. याची काळजी घेणं आवश्यक आहे.

खूप वेळ बसून काम करू नका. तीन तासांपेक्षा अधिक वेळ बसून काम केल्याने आपल्याला उच्च रक्तचाप आणि इतर आजार होऊ शकतात.

नंतर त्याचे प्रमाण इतके वाढते की तुम्ही जिममध्ये जाऊन व्यायाम केल्याने पण याची भरपायी होऊ शकत नाही. त्यामुळे काही वेळा नंतर चालणे किंवा फिरणे सुरु करा.

५ मिनिटांचा एक छोटा ब्रेक घ्या आणि पुन्हा काम करणे सुरु करा. नेहमी फळ आणि भाज्या नेहमी धुवून खा. बऱ्याचदा या फळांवर आणि भाज्यांवर कीटकनाशके, खते आणि इतर प्रदूषणाचा एक थर असतो.

जर तुम्ही हे धुतले नाही तर ते  सगळे विषारी पदार्थ तुमच्या शरीरात प्रवेश करतात. आपले भोजन  गरम गरम आणि मसालेदार असावे. आपले भोजन गरम आणि मसालेदार खाण्याचा प्रयत्न करा.

अध्ययन असे सांगते की जर जेवण गरम असेल तर तुम्ही कमी जेवता आणि भोजनात मसाल्याचे वेगळे गुण असतात. अशा प्रकारे ही पद्धत तुम्हाला अधिक कॅलरी कमी करण्यात मदत करेल.

स्वच्छतेचा आग्रह असणे गरजेचे आहे. जेवण करण्यापूवी स्वच्छ हात धुवा कारण याचा देखील परिणाम होऊ शकतो. कारण हातावरील सूक्ष्म जंतू तुमच्या पोटात जाऊन आजार उद्भवू शकतात.

LEAVE A REPLY

*