पक्षीगणनेसाठी गुगल अर्थचा वापर -पक्षीगणना कार्यशाळेत नंदकिशोर दुधे यांचे मार्गदर्शन

0

जळगाव |  प्रतिनिधी :  पक्षी गणेनेचे क्षेत्र निवडण्यासाठी गुगल अर्थ व व्हॉटसअपचा वापर करण्याबाबत पक्षीगणना कार्यशाळेत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे संशोधक सहाय्यक नंदकिशोर दुधे यांनी पक्षीमित्रांना मार्गदर्शन केले.

नुतन मराठा महाविद्यालयाच्या डॉ. बोस हॉलमध्ये शास्त्रीय पध्दतीने पक्षीगणना कशी करावी यावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या सुरवातीला दुर्मिक गिधाडाचे पुजन करण्यात आले.

IMG_2923

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख , पक्षीकवी श.मु.चौधरी, उपप्राचार्य आर.बी.देशमुख, पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ होते. ट्रांझीट लाईन कशी आखायची, आखलेल्या ट्रांझीट लाईनवरून कशी गणना करायची, दिसलेला पक्षी व त्याची संख्या कशी भरायची, कॉमन बर्डस् म्हणजे काय यासह अनेक विषयंावर दुधे यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले.

कार्यशाळेला जवळपास ४० पक्षीमित्रांची उपस्थिती होती. सुरवातीला पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी पक्षीगणेनेच्या शास्त्रीय पध्दती कार्यशाळेचा मुळ उद्देश सिटीझन साईटिस्ट तयार करणे हा असल्याचे संागितले. यावेळी प्रा.डॉ.एल.पी.देशमुख यांनी जैवविविधता महत्वाचा घटक आहे.त्यामुळे शास्त्रशुध्द पध्दतीने पक्षीगणना करणे गरजेचे असल्याचे सांगितले.

कार्यशाळेला प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस.एम. सोनवणे, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.जे.टी सोनवणे यांच्यासह उपप्राचार्य आर.बी.देशमुख यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

*